नमस्कार मित्रांनो,
कला क्षेत्रातील धातू कलेमध्ये गेली १४ वर्षे अखंडपणे काम केल्यानंतर आपला ‘गोडसेस स्टुडिओ’ आता अनुभवाची १५ वर्षे पूर्ण करत आहे.
याच निमित्ताने आम्ही आमचा अनुभव खेड्यापाड्यातील कलाकारांपर्यंत घेऊन जाण्यासाठी ‘आर्ट रेझिडेन्सी’ नामक एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमात नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोडसेस स्टुडिओ’ मार्फत कलाकारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आपणास नम्र विनंती करण्यात येते की, आपण आमच्या या कार्यास सहकार्य करावे.
या उपक्रमात आपल्या महाविद्यालयातील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना (फक्त मुलांना ) सामील होता येईल.
इच्छुक विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय स्टुडिओ मार्फत केली जाईल. तसेच प्रशिक्षणार्थींना योग्य ते मार्गदर्शन आणि मटेरियल ही स्टुडिओ कडूनच पुरवण्यात येईल.
मुंबई येथील स्टुडिओ मध्ये राबवण्यात येणारा या उपक्रमाचा कालावधी एकूण ६ दिवसांचा असेल.
ह्या उपक्रमात प्रशिक्षणार्थींनी घडवलेल्या कलाकृती या ‘गोडसेस स्टुडिओ’ मध्येच प्रदर्शनासाठी ठेवल्या जातील.
कार्यक्रमाची रूपरेषा
२८ जुलै २०२५ ते २ ऑगस्ट २०२५
- २८ जुलै – स्टुडिओ संदर्भात ओळख आणि मटेरियल स्टडी
- २९ जुलै – डिझाइन संदर्भात चर्चा आणि प्रतिकृती (mockup)
- ३० जुलै – प्रात्यक्षिक आणि मेटल टेक्निक्स
- ३१ जुलै – प्रॅक्टिकल
- ०१ ऑगस्ट – प्रॅक्टिकल
- ०२ ऑगस्ट – मार्केट स्टडी, अनुभव, कला चर्चा
वरील कार्यक्रमात बदल करण्याचे अधिकार गोडसेस स्टुडिओ कडे राखीव आहेत.